Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशदिल्ली हिंसाचार : राजधानीत आगडोंबामध्ये २३ बळी

दिल्ली हिंसाचार : राजधानीत आगडोंबामध्ये २३ बळी

High alert in Mumbai after of Delhi violenceनवी दिल्ली : दिल्लीमधील हिंसाचारातील मृतांची संख्या वाढून २३ वर पोहचली आहे. आज बुधवार (२६ फेब्रुवारी) ४ आणखी मृतदेह मिळाले आहेत. यात एका गुप्तचर विभागाच्या (आयबी) कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांचा मृतदेह चांद बाग परिसरात मिळाला. अंकित बेपत्ता होते आणि याबाबत त्यांच्या कुटुंबियांकडून पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली होती. अंकित शर्मा चांद बाग भागातच राहत होते. त्यांचा हिंसाचारातील दगडफेकीत मृत्यू झाल्याचा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

चांद बाग पोलिसांना आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांचा मृतदेह एका नाल्यामध्ये सापडला. ही घटना मंगळवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, चांद बागमध्ये झालेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या वाढतच चालली आहे. यात जवळपास २०० लोक जखमी झाले आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

अंकित शर्मा यांच्या कुटुंबियांनी सांगितले, की अंकित यांच्या डोक्यावर तलवारीने वार केले आहेत. त्याच्यावर चाकूने देखील हल्ला करण्यात आला आहे. नाल्यामध्ये दगडाच्या साहाय्याने अंकित शर्मा यांचा मृतदेह पाण्यात दाबून ठेवण्यात आला होता. सुरुवातीला पीडित कुटुंब अंकित बेपत्ता असल्याची तक्रार खजूरी खास पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यासाठी गेले. मात्र, नंतर त्यांची तक्रार दयालपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेण्यात आली. दरम्यान, दिल्ली हिंसाचारात हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांनाही आपला प्राण गमवावा लागला. दंगलीतील आरोपींच्या हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments