Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभेसाठी  4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज पास

विधानसभेसाठी  4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज पास


विधानसभा निवडणुकीसाठी सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये 5 हजार 543 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मात्र सोमवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर किती उमेदवार रिंगणात राहतात हे स्पष्ट होईल.

राज्यातील नामनिर्देशनपत्रांची अर्जाची छाननी शनिवारी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 5 हजार 543 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर 798 उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने ते नामंजूर झाले आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.

जिल्ह्यानुसार मतदारसंघात उमेदवारांचे अर्ज…

नंदुरबार : जिल्ह्यात 4 मतदारसंघात 36 उमेदवार.

धुळे : जिल्ह्यात 5 मतदारसंघात 56 उमेदवार.

जळगाव : जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार.

बुलढाणा : जिल्ह्यात 7 मतदारसंघात 75 उमेदवार.

अकोला : जिल्ह्यात 5 मतदारसंघात 101 उमेदवार.

 वाशिम : जिल्ह्यात 3 मतदारसंघात 60 उमेदवार.

अमरावती : जिल्ह्यात 8 मतदारसंघात 151 उमेदवार. 

वर्धा : जिल्ह्यात 4 मतदारसंघात 59 उमेदवार.

नागपूर : जिल्ह्यात 12 मतदारसंघात 181 उमेदवार.

भंडारा : जिल्ह्यात 3 मतदारसंघात 66 उमेदवार.

गोंदीया : जिल्ह्यात 4 मतदारसंघात 71 उमेदवार.

गडचिरोली : जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार.

चंद्रपूर : जिल्ह्यात 6 मतदारसंघात 90 उमेदवार.

यवतमाळ : जिल्ह्यात 7 मतदारसंघात 125 उमेदवार.

नांदेड : जिल्ह्यात 9 मतदारसंघात 327 उमेदवार.

हिंगोली : जिल्ह्यात 3 मतदारसंघात 54 उमेदवार.

परभणी : जिल्ह्यात 4 मतदारसंघात 81 उमेदवार.

जालना : जिल्ह्यात 5 मतदारसंघात 133 उमेदवार.

औरंगाबाद : जिल्ह्यात 9 मतदारसंघात 208 उमेदवार.

नाशिक : जिल्ह्यात 15 मतदारसंघात 212 उमेदवार.

पालघर : जिल्ह्यात 6 मतदारसंघात 69 उमेदवार.

ठाणे : जिल्ह्यात 18 मतदारसंघात 251 उमेदवार.

मुंबई उपनगर : जिल्ह्यात 25 मतदारसंघात 272 उमेदवार.

मुंबई शहर : जिल्ह्यात 10 मतदारसंघात 84 उमेदवार. दरम्यान यात वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती दर्शवलेली  नाही.

रायगड : जिल्ह्यात 7 मतदारसंघात 112 उमेदवार.

पुणे : जिल्ह्यात 21 मतदारसंघात 372 उमेदवार.

अहमदनगर : जिल्ह्यात 12 मतदारसंघात 182 उमेदवार.

बीड : जिल्ह्यात 6 मतदारसंघात 202 उमेदवार.

लातूर : जिल्ह्यात 6 मतदारसंघात 120 उमेदवार.

उस्मानाबाद : जिल्ह्यात 4 मतदारसंघात 82 उमेदवार.

सोलापूर : जिल्ह्यात 11 मतदारसंघात 237 उमेदवार.

सातारा : जिल्ह्यात 8 मतदारसंघात 108 उमेदवार.

रत्नागिरी : जिल्ह्यात 5 मतदारसंघात 40 उमेदवार,

सिंधुदूर्ग : जिल्ह्यात 3 मतदारसंघात 27 उमेदवार.

कोल्हापूर : जिल्ह्यात 10 मतदारसंघात 186 उमेदवार.

सांगली : जिल्ह्यात 8 मतदारसंघात 111 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments