Friday, March 29, 2024
Homeदेशदिल्ली दंगल : आपच्या नगरसेवकाचा हत्याकांडात सहभाग नाही

दिल्ली दंगल : आपच्या नगरसेवकाचा हत्याकांडात सहभाग नाही

Tahir Hussain Delhi Riots,Tahir Hussain, Delhi Riots,Tahir, Hussain, Delhi, Riotsनई दिल्ली : दिल्ली दंगल, आईबी कर्मचारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन सध्या अटकेत आहे. शर्मा यांच्या हत्याप्रकरणात हुसैनचा कोणताही संबंध नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागली नसून पोलीस कसून चौकशी करत आहेत.

पोलिसांना हुसैनच्या मोबाईलमधूनही कोणतेही ठोस पुरावे लागले नाही. दिल्ली दंगलीचाही हुसैनवर आरोप असून त्या संबंधीही त्याची भूमिका स्पष्ट झाली नाही. त्याचा दंगलीत सहभाग नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. हुसैनने हत्याकांडामध्येही कोणताही सहभाग नसल्याचे पोलिसांना स्पष्टपणे सांगितले अशी माहिती सुत्रांनी दिली.

परवानाधारक शस्त्र असलेल्या नागरिकांचीही पोलीस कसून चौकशी करत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने  ७०२ एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत २३८७ नागरिकांना अटक करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments