Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशबॉम्बचे प्रशिक्षण देणा-या दहशतवाद्याला बेड्या

बॉम्बचे प्रशिक्षण देणा-या दहशतवाद्याला बेड्या

नालासोपारा बनला दहशतवाद्यांचा अड्डा!

नालासोपारा : नालासोपारा हा दहशतवाद्याच्या अड्डा बनला आहे. बाँम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देणारा दहशतवादी जुदीष्टीर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (३४) याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी पश्चिम बंगालमधून अटक केली. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देत होता.

पुण्यातील सनबर्न या पाश्चात्य संगीत कार्यक्रमात घातपात करण्याचा कट रचल्याप्रकरणी नालासोपारा येथून अटक झालेल्या वैभव राऊत याच्यासह १२ जणांना प्रशिक्षण दिल्याचा हाजरा याच्यावर आरोप आहे. एटीएसच्या पथकाने ऑगस्ट, २०१८ मध्ये नालासोपारा येथून वैभव राऊत तर पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांची धरपकड केली. त्यानंतर वैभव राऊतच्या निवासस्थानी आणि गोदामातून गावठी बॉम्ब, स्फोटके, रसायने, शस्त्रे, बॉम्ब तयार करण्याचे अन्य साहित्य मोठ्या प्रमाणावर हस्तगत करण्यात आले होते. तिघांच्या चौकशीत आलेल्या माहितीवरून एटीएसने राज्यभर छापे टाकून आणखी नऊ जणांना अटक केली.

अविनाश पवार, वासुदेव सुर्यवंशी उर्फ मॅकेनिक, लीलाधर लोधी उर्फ विजय उर्फ लंबू उर्फ भय्या, सुजीथ कुमार उर्फ प्रवीण रंगास्वामी, भारत कुरणे उर्फ अंकल, अमोल काळे उर्फ भाईसाहेब उर्फ संजय भन्सारे, अमित बड्डी उर्फ गोविंदा, गणेस मिस्कीन उर्फ मिथुन अशा १२ जणांना अटक केली. विशेष म्हणजे या दशतवाद्यांच्या टोळीने पिस्तुले, गावठी बॉम्ब तयार करुन हिंदू धर्म, रुढी, प्रथा परंपरा यांना विरोध, विडंबन लिखाण आणि लिखाण करणा-यांना व्यक्ती आणि कार्यक्रमांना लक्ष्य करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता. या कार्यकर्त्यांनी विचारवंतांचे हत्यासत्र घडविण्यासोबत अनेक ठिकाणी घातपाताचे कट आखले होते.

यामध्ये डिसेंबर २०१७  मध्ये पुणे येथे आयोजित सनबर्न कार्यक्रमात घातपात घडविण्याचा कट आखला होता, अशी माहिती समोर आली. या कटामध्ये हाजरा याचाही हात होता; मात्र इतरांच्या अटकसत्रानंतर तो फरार झाला. तपासादरम्यान पश्चिम बंगालमधील उस्टी या गावात तो असल्याचे समजले. यावरून बंगालच्या विशेष कृती दलाच्या मदतीने एटीएसच्या अधिकाऱ्यांनी हाजरा याला अटक केली. हाजरा याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments