Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशनिर्भयाचा आरोपी म्हणाला तुरुंगात माझं लैंगिक शोषण झालं!

निर्भयाचा आरोपी म्हणाला तुरुंगात माझं लैंगिक शोषण झालं!

Mukesh Singh Nirbhaya,Mukesh Singh, Nirbhaya,Mukesh, Singhनवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपी फाशीची शिक्षा लांबणीवर टाकण्यासाठी नवनवीन आरोप करत आहेत. आरोपी मुकेश सिंह याने एक आरोप केला आहे. तुरुंगात माझं लैंगिक शोषण करण्यात आलं. तुरुंगाधिकारीही त्यावेळी उपस्थित होते. मात्र त्यांनी मला मदत केली नाही, असं मुकेशने म्हटलं आहे.

मुकेशच्यावतीने त्याच्या वकील अंजना प्रकाश यांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. मुकेशचं लैंगिक शोषण झाल्यानंतर त्याला दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आलं. त्याचा मेडिकल अहवाल कुठेय? असा सवाल अॅड. अंजना प्रकाश यांनी केला. यावेळी अंजना प्रकाश यांनी मुकेशचा भाऊ राम सिंह याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही केला. राम सिंहने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं तुरुंगाधिकारी सांगत आहेत. मात्र, त्याचा एक हात खराब होता. तो ९४ टक्के परावलंबी होता. तो फाशी कसा घेईल? असा सवाल करतानाच भावाची हत्या करण्यात आल्याने मुकेशला एफआयआर दाखल करायचा होता, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी तिहार तुरुंग प्रशासनावरही गंभीर आरोप केले. क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यापूर्वीच मुकेशला एकांतात ठेवण्यात आलं होतं, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, मुकेशच्या या नव्या दाव्यामुळे याप्रकरणाला वळण लागण्याची चिन्हे असून कोर्ट त्यावर काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अत्याचाराच्या वेळी घटनास्थळी नव्हतो…

दरम्यान, निर्भयावर आपण बलात्कार केला नव्हता. ही घटना घडली तेव्हा आपण घटनास्थळी हजर नव्हतो, असं मुकेशने कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तर संविधानानुसार जगण्याचा अधिकार हा स्वातंत्र्याचा सर्वात मोठा अधिकार आहे, असं अंजना यांनी सांगितलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दया याचिकेवर विनाकारण घाईत निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचीही न्यायिक समीक्षा होऊ शकते, असंही त्या म्हणाल्या. निर्भयाप्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आली होती का? त्याची न्यायालय चौकशी करू शकते, असंही त्या म्हणाल्या. तर न्यायालयाने राष्ट्रपतींद्वारा निर्णय देण्याच्या पद्धतीवर कोणीही निर्देश देऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments