Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईच्या अंधेरीत रोल्टा कंपनीत पुन्हा आग भडकली

मुंबईच्या अंधेरीत रोल्टा कंपनीत पुन्हा आग भडकली

थर्मल इमॅजीन कॅमेरॅच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न

Andheri Rolta Company Fire,Andheri Fire, Rolta Company Fire,Rolta Fire,Andheri, Rolta ,Company, Fire,Andheri Rolta ,Andheri Company Fire,Andheri Company

मुंबई : अंधेरी पूर्वमधील सिप्झ एमआयडीमधील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला गुरुवारी भीषण आग लागली होती. साडे पाच तासानंतर आग आटोक्यात आणली होती. मात्र पुन्हा संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आग भडकली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. थर्मल इमॅजीन कॅमेरॅच्या मदतीने आग नेमकी कुठे लागलीय याचा शोध घेऊन ती विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. साडेपाच तासानंतर आग नियंत्रणात आली होती. सध्या ही आग आणखीनच भडकत चालली आहे.

ही इमारत संपूर्ण काचेची इमारत असल्याने यामध्ये हवा खेळती राहत नसल्याने प्रचंड धूर आणि आगीचे लोळ उठत असल्याने आग विझवण्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, या इमारतीची वीज बंद करण्यात आली आहे. सुदैवानं या इमारतीत कोणताही कर्मचारी अडकलेला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

मुंबईच्या अंधेरीत रोल्टा कंपनीत पाच तासापासून अग्नितांडव

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments