Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्याअजित पवार म्हणाले, मी राष्ट्रवादीतच!

अजित पवार म्हणाले, मी राष्ट्रवादीतच!

Ajit Pawar said, I am in NCP!मुंबई : अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची गुपचूप शपथ घेतल्यानंतर आज रविवारी सोशल मीडियावर सक्रीय झालेले आहेत. शपथ घेतल्यानंतर अभिनंदन केलेल्या सर्व भाजपा नेत्यांचे अजित पवार यांनी आभार मानले आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे.

अजित पवारांसोबत गेलेले आमदार परत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आले. तर वरिष्ठ नेते अजित पवारांची मनधरनी करत आहेत. अजित पवारांनी एक सूचक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आणला आहे. याचसोबत अजित पवारांनी आपल्याला मिळालेल्या पाठींब्याबद्दल सर्वांचे आभार मानत, थोडा संयम राखण्याचंही आव्हान आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments