Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनआमिर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ समोर अक्षय कुमारची माघार

आमिर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ समोर अक्षय कुमारची माघार

Laal Singh Chaddha Bachchan Pandey,Laal Singh Chaddha, Bachchan Pandey,Laal, Singh, Chaddha, Bachchan, Pandey,Laal Singh,Amir khan,Aamir khan,aamir,amir,akshay kumar,akshay,kumar,akkiमुंबई : एकाच दिवशी अनेक हिंदी सिनेमे प्रदर्शित होऊन एकमेकांशी स्पर्धा करताना  दिसतात. मात्र अक्षय कुमार आमिर खान सोबत स्पर्धा न करता स्पर्थेतून माघार घेतली आहे.

ख्रिसमसला यंदा आमिर खान आणि अक्षय कुमार या दोन्ही बड्या अभिनेत्यांचा चित्रपट ख्रिसमसला शर्यतीत आमिर खान आणि अक्षय कुमार हे दोन तगडे स्टारही मागे नव्हते. पण आता त्यांनी या शर्यतीतून स्वतःला वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः आमिरने ट्विटरवर याची माहिती दिली.

 

यंदाच्या ख्रिसमसला अक्षय कुमारचा बच्चन पांडे आणि आमिर खानचा लाल सिंह चड्ढा सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होणार होता. पण आता ख्रिसमसला फक्त आमिर आणि करिना कपूरचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बच्चन पांडेच्या निर्मात्यांनी सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला.

आमिर खानने ट्वीट करून अक्षय कुमार आणि साजिद नाडियावाला यांनी सिनेमाची तारीख बदलली असल्याचं सांगितलं. आमिरने ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘अनेकदा बोलून प्रश्न मिटतात. माझे मित्र अक्षय कुमार आणि साजिद नाडियावाला यांनी माझ्या विनंतीवर त्यांच्या बच्चन पांडे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली यासाठी दोघांचे आभार. त्यांच्या सिनेमासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.’

अक्षय कुमारचा या सिनेमातील फर्स्ट लुकही समोर आला…

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही ट्विटरवरून लाल सिंह चड्ढा आणि बच्चन पांडे या सिनेमांच्या तारखा बदलल्याची माहिती दिली. दरम्यान, अक्षय कुमारचा या सिनेमातील फर्स्ट लुकही समोर आला आहे. यात अक्षयने सोनेरी किनार असलेली काळ्या रंगाची धोती नेसली आहे. तसेच गळ्यात सोन्याच्या जाड चैन घातल्या आहेत.

बच्चन पांडे सिनेमा पुढच्या वर्षी २१ जानेवारीला प्रदर्शित होणार…

यासोबतच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही शेअर केली आहे. बच्चन पांडे सिनेमा पुढच्या वर्षी २१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर आमिर खानचा लाल सिंह चड्ढा सिनेमा याचवर्षी ख्रिसमला अक्षय कुमारचा या सिनेमातील फर्स्ट लुकही समोर आला प्रदर्शित होणार आहे. सध्या आमिर खान सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments