Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासिंघू सीमेवर जमावाकडून दगडफेक, पोलिसांवर तलवार हल्ला

सिंघू सीमेवर जमावाकडून दगडफेक, पोलिसांवर तलवार हल्ला

नवी दिल्ली : २६ जानेवारी २०२१ रोजी शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन चिघळल्याचं पहायला मिळालं. दिल्लीतील सिंघू सीमेवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांत तणाव निर्माण झाला. यावेळी जमावाकडून दगडफेक सुद्धा करण्यात आली. ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला. तसेच अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडूनही पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक नागरिक मागणी करत आहेत की, आंदोलक शेतकऱ्यांनी सिंघू सीमा रिकामी करावी कारण त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅली दरम्यान तिरंग्याचा अपमान केला आहे. तसेच शेतकरी आंदोलनामुळे त्यांना इतर समस्यांचाही सामना करावा लागत आहे.

पोलिसांवर तलवार हल्ला 

स्थानिक आंदोलकांच्या मते, शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे त्यांच्या रोजगाराची सर्व साधने नष्ट झाली आहेत. तसेच त्यांना येण्या-जाण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर या दरम्यान अलीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी (एसएचओ) प्रदीप कुमार हे सुद्धा जखमी झाले आहेत आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रदीप कुमार यांच्यावर एका आंदोलनकर्त्याने तलवारीने हल्ला केला. या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. दरम्यान या दगडफेकीत एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाला आहे.

स्थानिकांचे शेतकऱ्यांच्या विरोधात आंदोलन

शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांच्या जमावाने हातात काठ्या घेऊन प्रदर्शनस्थळ गाठले. स्थानिकांचा दावा आहे की, सिंघू सीमेच्या आसपास राहणाऱ्या ४० गावांच्या पंचायतने निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांना सींघू सीमेवरुन हटवण्यात यावे. स्थानिकांनी शेतकऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि तेथून निघून जाण्याची मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments