Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशअमित शाह – जे.पी. नड्डांचा होळी साजरी न करण्याचा निर्णय!

अमित शाह – जे.पी. नड्डांचा होळी साजरी न करण्याचा निर्णय!

J P Nadda Amit shah Meeting,Amit Shah, J P Nadda,BJP, Assembly Elections,Shiv Sena,Alliance

नवी दिल्ली : भारतात आत्तापर्यंत एकूण २८ लोक करोनाबाधित आढळले आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांच्या पाठोपाठ आता गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीसुध्दा होळी न खेळण्याचा ट्विटरवरून जाहीर केलं आहे.

 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी तज्ञांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्याचं टाळण्याचा सल्ला दिला आहे. यामुळेच नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण होळीच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला वित्तीय संकटानंतरचा सर्वात मोठा धोका निर्माण केला आहे. तर दुसरीकडे देशात तीन कोरोनाचे २८ रूग्ण आढळल्यानंतर सर्वांनीच दक्षता घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा होळी खेळणार नाही असं जाहीर केलं आहे.

दिल्लीच्या २५ हॉस्पीटलमध्ये विशेष कक्ष स्थापन केले आहेत. कर्माचा-यांसाठी आठ हजार कीट व साडेतीन लाख मास्क दिले आहेत. परदेशांतून आलेल्या आयटीबीपीच्या शिबीरात ठेवण्यात येणार असून, त्यासाठी २५०० लोकांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चीन हाँककाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान,नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम,मलेशिया, इराण व इटली येथून आलेल्या ६५,६२१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.

देशभरातील ६२ विमानतळांवर सीआयएसएफचे जवान तैनात असतात. त्यामुळे देशाच्या सर्व विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानांना मास्क, सॅनिटायझर, हातमौझे देण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments