Thursday, April 18, 2024
Homeदेशअमित शहा यांना दिल्लीत प्रचारबंदी करण्यात यावी : आप

अमित शहा यांना दिल्लीत प्रचारबंदी करण्यात यावी : आप

Amit Shah Arvind Kejriwal,Amit Shah, Arvind Kejriwal,Amit, Shah, Arvind, Kejriwalनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप विरुध्द भाजप युध्द चांगलेच रंगले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपहार्य वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ४८ तासांसाठी प्रचारबंदी करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आपचे नेते संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली आहे. अमित शहा हे त्यांच्या खासदारांनासोबत घेऊन दिल्लीच्या शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे बनावट व्हिडिओ करून अपमान करत आहेत. त्यामुळेच शहा यांना ४८ तासांसाठी निवडणूक प्रचारबंदी करण्यात यावी, अशी मागणी आपने केली आहे.

भाजपवाले जेवढ्या शिव्या घालतील, तेवढ्याच जोशाने जनता मतदान करेल…

भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. वर्मा यांचं ते आक्षेपहार्य वक्तव्य शिक्षणावर काम करणाऱ्या केजरीवाल यांच्याविरोधातील आहे. शिक्षण क्षेत्रासाठी भरीव काम करणाऱ्या केजरीवालांना भाजपचे खासदार वर्मा हे दहशतवादी संबोधत आहेत. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा, शहिदांच्या कुटुंबीयांना एक कोटीचं अर्थसहाय्य देणाऱ्या व्यक्तिविरोधात असं वक्तव्य करणं योग्य नाही. भाजप केजरीवाल यांना जेवढ्या शिव्या घालतील, तेवढ्याच जोशाने दिल्लीची जनता आपला भरघोस मतदान करून भाजपला प्रत्युत्तर देतील, असं सिंह यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments