Friday, March 29, 2024
Homeदेशअमित शाह यांचं सीएएवरून मोठं विधान!

अमित शाह यांचं सीएएवरून मोठं विधान!

Amit Shah Kolkata,Amit Shah, Kolkata,Amit, Shahकोलकाता : देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. मात्र, यावरून गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधानं केलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. पण आम्ही सीएएवर मागे हटणार नाही. असं अमित शहा यांनी कोलकतामध्ये रॅलीला संबोधित करताना सांगितले.

गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकातामध्ये आज रविवार ( १ मार्च) रोजी जाहीर सभा घेतली आहे. सीएए, काश्मीर, राम मंदिर आणि श्यामा प्रसाद मुखर्जींच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर हल्ला चढवला. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. पण आम्ही सीएएवर मागे हटणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह राज्यात सत्तेत येईल, असं अमित शहा म्हणाले.

अमित शाह म्हणाले, विरोधी पक्षात असताना ममता बॅनर्जींनी शरणार्थींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीएए कायदा आणलाय तर ममता बॅनर्जी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत जाऊन विरोध करत आहेत. ममता बॅनर्जी अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. सीएएमुळे नागरिकत्व देण्यात येतं. त्याने कुणाचं नागरिकत्व काढून घेतलं जात नाही. सीएएमुळे अल्पसंख्याकांवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं शहा यांनी स्पष्ट केलं. कोलकाताच्या शहीद मैदानात सीएए समर्थनात जाहीसभा आयोजित करण्यात आली होती. यासभेत शहा बोलत होते.

आगामी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताने सत्तेत येईल. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आम्हाला प्रचार करू दिला नाही. हेलिकॉप्टर उतरू दिले गेले नाही. गोळीबार केला गेला. ४० हून अधिक कार्यकर्ते त्यात ठार झाले. तरीही ममता बॅनर्जी भाजपला रोखू शकल्या नाही. असंही शाह म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments