Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रआनंदवार्ता : मुंबई महापालिकेत मेगाभरती!

आनंदवार्ता : मुंबई महापालिकेत मेगाभरती!

bmc

मुंबई : मुंबई महापालिकेकडून तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर महापालिकेत आता महाभरती होणार आहे. कार्यकारी सहाय्यक पदाच्या (लिपिक) ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत. उद्या, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ५०० रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अशी आहे पध्दत…

भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

महाऑनलाइन ही सरकारी कंपनी भरती प्रक्रिया राबवणार…

भरतीसाठी उमेदवारांची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा होणार आहे. राज्य सरकारच्या महाआयटी आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांनी ही परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. महाऑनलाइन ही सरकारी कंपनी भरती प्रक्रिया राबवणार असल्याने जाहिरातीद्वारे निविदा मागवण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments