Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअण्णा हजारेंचा 'या' कारणावरून मौनव्रत

अण्णा हजारेंचा ‘या’ कारणावरून मौनव्रत

Anna hazare to start maunvrat in Ralegan-Siddhi on women security issue in india
Representational Image : ANNA HAZARE

अहमदनगर : माहिला अत्याचाराविरुद्ध देशभरात घडलेल्या घटनांच्या विरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून आंदोलन पुकारले आहे. देशभरातील बलात्काराच्या आरोपातील गुन्हेगारांना दिली जाणारी शिक्षेची प्रक्रिया जलद व्हावी, ह्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी २० डिसेंबर पासून त्यांचे मुळगाव राळेगणसिद्धी येथे मौनव्रत ठेऊन आंदोलन पुकारले आहे.

अण्णा हजारे यांनी सादर केलेल्या पत्रकात…

मागील काही काळात देशभरातील वगवेगळ्या भागात महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे उलटली तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही, देशात फास्टट्रॅक कोर्टात लाखो प्रकरणे पडून आहेत, न्याय आणि शिक्षेला उशीर होत आहे. अशा घटनांमुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडत चालला आहे. हे रोखण्यासाठी सरकारने जलद कारवाई करावी अशी मागणी अण्णा हजारे यांनी सादर केलेल्या एका पत्रकातून प्रसिद्धी केली आहे.

2014साली बलात्कार आणि हत्या प्रकरणात शेवटची फाशी झाली होती. त्यानंतर देशभरात 426 प्रकरणात फाशीची शिक्षा झाली असून त्यांची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. या कारणामुळे न्यायव्यवस्थेच्या जलद कामावर लोकांना संशय निर्माण होत आहे. अशा शब्दात अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आंदोलन पुकारण्याआधी अण्णांचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र

अण्णा हजारे यांनी २० डिसेंबर पासून राळेगणसिद्धी येथे मौनव्रत ठेऊन आंदोलन पुकारले आहे.
हे आंदोलन पुकारण्याआधी अण्णा यांनी 10 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, तर 13 डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्रातून याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments