Friday, March 29, 2024
Homeदेश...अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही : जितेंद्र आव्हाड

…अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Narendra Modi,Jitendra, Awhad, Narendra, Modi,Jitendra Awhad, Narendra Modi,Chhatrapati Shivaji Maharaj,Shivaji maharaj,Shivaji,Aaj ke Shivaji Narendra modi,Aaj ke shivajiनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत, या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली भाजप कार्यालयात प्रकाशन झालं. नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली. त्यामुळे गृहमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

डॉ. आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहीले, जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. आज के शिवाजी नरेंद्र मोदी पटत नाही मनाला असं ट्विट केलं. विशेष म्हणजे भाजपच्या त्या पुस्काचं सर्वचं स्तरातून निषेध व्यक्त केलं जातं आहे.

शनिवारी दिल्लीमध्ये “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, माजी खासदार महेश गिरी, प्रभारी श्याम जाजू, या नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. भगवान गोयल यांनी फेसबुक व ट्वीटरवरुन पोस्ट करत ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वीच  शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या बाजूला नरेंद्र मोदींची प्रतिमा जोडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यावेळी भाजपच्या आयटीसेलवर जोरदार टीका करण्यात आली होती. आता पुस्तक प्रकाशनावरून वाद होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments