Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeदेशगर्भवती महिलेसाठी बर्फवृष्टीतून चार तास जवानांची पायपीठ

गर्भवती महिलेसाठी बर्फवृष्टीतून चार तास जवानांची पायपीठ

India Army Kashmir,India Army, Kashmir,Jammu and kashmir,Pregnant Woman Kashmir,Pregnant woman,Woman delivery,Narendra Modi,narendra modi tweet,modi tweets,modi
Image: Agencies

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टीमुळं एक गर्भवती महिलेसाठी जवान देवदूत म्हणून धावून आले. बर्फवृष्टी सुरू असताना, एक गर्भवती महिला रुग्णालयात जात होती. त्याचवेळी लष्कराचे जवळपास १०० जवान तिच्यासोबत होते. तब्बल चार तास गर्भवती महिलेला उचलून पायी चालले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले. शेवटी महिलेची सुखरूप प्रसूती झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांचे कौतुक केले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी होत आहे. हिमवादळामुळं काश्मीरमधील अनेक ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टी आणि हिमस्खलनाच्या घटनांमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. लष्कराच्या जवानांकडून काही ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. लष्कराचे १०० जवान एका गर्भवती महिलेच्या मदतीसाठी धावल्याची माहिती चिनार कॉर्प्सकडून देण्यात आली. त्याचा व्हिडिओही ट्विट करण्यात आला.

वान गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले

बर्फवृष्टी सुरू असताना शमीमा या महिलेला रुग्णालयात घेऊन जायचं होतं. तिला मदतीची गरज होती. त्याचवेळी १०० जवान तिच्या मदतीला धावून गेले. बर्फवृष्टीत जवान तिच्यासोबत चार तास चालले. अन्य ३० नागरिकही तिच्यासोबत होते. शमीमाला स्ट्रेचरवरून नेण्यात येत होतं. हे जवान गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले. तिनं मुलाला जन्म दिला असून, दोघांची प्रकृती उत्तम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments