Thursday, March 28, 2024
Homeविदर्भनागपूरअरुण गवळीची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले

अरुण गवळीची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले

Arun Gawali infected with Coronavirus in Jail
Arun Gawali infected with Coronavirus in Jail

नागपूर: कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून अरूण गवळीची प्रकृती सातत्याने खालावत आहे. सध्या गवळीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे अरुण गवळीला आता उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी अरूण गवळीची प्रकृती खराब झाली होती. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी गवळी व इतर कैद्यांची कोरोना चाचणी करवून घेतली. त्यामध्ये अरूण गवळीसह पाच कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने अरूण गवळीसह कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले.

गेल्या चार दिवसांपासून अरूण गवळी याच्यावर तुरुंगातील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. गवळीला दिवसातून तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे दिली जात होती. परंतु, या उपचारांचा विशेष फायदा झाला नाही.

अखेर आज सकाळी त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने गवळीला मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. सध्या याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव अरूण गवळी याच्यावर मेडिकल का कारागृहातील रुग्णालयातच पुढील उपचार करावे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

अरुण गवळीच्या पॅरोल आणि फर्लो रजा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यात अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे.

आधी पत्नीच्या आजारपणाचं कारण, नंतर लॉकडाऊनमुळे अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये मुदतवाढ

पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणास्तव न्यायालयाने सुरुवातीला अरुण गवळीला 45 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार, त्याला 27 एप्रिलपर्यंत आत्मसमर्पण करायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे नागपूरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. यानंतर न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. त्यामुळे अरुण गवळीला कारागृहात हजर होण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली होती.

अरुण गवळी पॅरोलवर असतानाच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलीचा विवाहसोहळा देखील संपन्न झाला. अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासोबत योगिता गवळी 8 मे रोजी विवाहबद्ध झाली. कन्यादान करताना अरुण गवळी भावूक झाल्याचंही दिसलं होतं. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments