Thursday, March 28, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्र विकास आघाडीला 'हा' नवीन भिडू मिळाला

महाराष्ट्र विकास आघाडीला ‘हा’ नवीन भिडू मिळाला

Bahujan Vikas Aaghadi supports the maha vikas Aaghadi Hitendra Thakurमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सत्तास्थापन करणार आहे. उध्दव ठाकरे उद्या गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सत्तापरिवर्तन होताच आधी भाजपला पाठिंबा देणा-या बहुजन विकास आघाडीने आता महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा दर्शविला. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सत्ता आमची असेल, असं म्हणत महाविकासआघाडीला पाठिंबा देत असल्याचे संकेत दिले आहेत.

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने काँग्रेस महाआघाडीसोबत विधानसभा निवडणूक लढवली होती. ठाकूर यांच्या आघाडीचे तीन आमदार निवडूण आले आहेत. निकालानंतर ठाकूर यांच्या आघाडीने भाजपला पाठिंबा दर्शविला होता. परंतु भाजप सत्तास्थापन करु न शकल्यामुळे ठाकूर पुन्हा महाराष्ट्र विकास आघाडीच्या गोटात परतणार आहेत. त्यामुळे सत्ता परिवर्तन होताच अपक्ष व छोटे पक्षसुध्दा पाठिंबा दर्शवितात असेच सध्याचे चित्र आहे.

मंगळवारीच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सुटला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आज बुधवारी सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महाराष्ट्र विकास आघाडीसोबत येण्याचे संकेत दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments