Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईबाळासाहेब थोरातांनी नाकारले, सतेज पाटलांनी स्वीकारले

बाळासाहेब थोरातांनी नाकारले, सतेज पाटलांनी स्वीकारले

Vishwajeet Kadam Satej Patil,Vishwajeet Kadam, Satej Patil,Vishwajeet, Kadam, Satej, Patilमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं आठवड्याभरापूर्वी पालकमंत्रीपद जाहीर केले होते. त्यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, ते स्विकारण्यास त्यांनी नकार दिला होता. अखेर कोल्हापूरचे पालकमंत्रीपद सतेज पाटलांकडे देण्यात आले आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीनं पहिल्या यादीत शिवसेनेकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२ तर काँग्रेसकडे ११ पालकमंत्रीपदं आले होते. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, ते स्विकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती. मात्र, यामध्ये अखेर सतेज पाटलांनी बाजी मारली. कोल्हापूरचे पालकमंत्रिपद सतेज पाटलांकडे तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विश्वजीत कदम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments