Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याएक नोव्हेंबरपासून बँकांचे कामकाज 'या' तीनवेळात होणार !

एक नोव्हेंबरपासून बँकांचे कामकाज ‘या’ तीनवेळात होणार !

bank new working hours timings national regional rural banks employees
नवी दिल्ली : देशभरातील बँका आता निर्धारित वेळेत चालणार आहेत. बँकांच्या शाखांच्या वर्गवारीनुसार बँकांचे कामकाज तीन वेळांत होणार आहे. ९ ते ३ , १० ते ४  व  ११ ते ५ या वेळांमध्ये बँकांचे कामकाज चालणार आहे. हे नवे वेळापत्रक एक नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

विविध बँकेच्या शाखांच्या कामकाजाची वेळ वेगवेगळी असल्याने ग्राहकांचा संभ्रम होतो. त्यावर इंडियन बँक असोसिएशननेच तोडगा काढला आहे. या निर्णयानुसार निवासी क्षेत्रातील बँका ९ ते ४ या वेळेत सुरू राहतील आणि त्यापैकी ९ ते ३ या वेळेत ग्राहकांना त्यांचे व्यवहार करता येतील. व्यापारी भागातील शाखा ११ ते ६ या वेळेत सुरू राहतील. या शाखांच्या ग्राहकांना ११ ते ५ या वेळेत आपले व्यवहार करता येतील, तर उर्वरित परिसरातील शाखा १० ते ५ दरम्यान सुरू राहतील व तेथील ग्राहक १० ते ४ या वेळेत व्यवहार करू शकतील.

इंडियन बँक्स असोसिएशनच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला होता. त्यात तीन वेळांचे प्रस्ताव देण्यात आले होते. त्यावर राज्य पातळीवरील बँकिंग समितीने (एसएलबीसी) निर्णय घ्यायचा होता. त्यानुसार राज्यातील लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर्सनी आपल्या शाखास्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून, वेळांचे तीन पर्याय निवडले आहेत. महाराष्ट्रासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ही अग्रणी (लीड) बँक आहे. त्यामुळे ‘एसएलबीसी’चे अध्यक्षपदही बँक ऑफ महाराष्ट्रकडे आहे. त्यामुळे एसएलबीसीने हे वेळापत्रक घोषित केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाइटवर वेळापत्रक उपलब्ध आहे.

https://www.bankofmaharashtra.in/miscellaneous या लिंकवर हे वेळापत्रक पाहता येईल. यामुळे ग्राहाकांना दिलासा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments