Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्यापाच दिवस बॅंका राहणार बंद ; बँकेचे व्यवहार उरकून घ्या !

पाच दिवस बॅंका राहणार बंद ; बँकेचे व्यवहार उरकून घ्या !

bank-strike- september

राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी 26 आणि 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. बॅंकाना सलग सुट्या त्यामुळे पाच दिवस बँकिंगचे व्यवहार ठप्प होणार आहेत. त्यामुळे आजच बँकेशी संबंधित व्यवहार उरकून घ्या.

बँकांचे अधिकारी 26 आणि 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. तसेच 28 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आहे, 29 सप्टेंबरला रविवार असल्यानं त्यादिवशीही बँकांचं कामकाज ठप्पच राहणार आहे. 30 सप्टेंबर रोजी अर्धवार्षिक कामांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नसून 1 ऑक्टोबरला आता बँकांची कामं करावी लागणार आहेत.

बँकेचे अधिकारी विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. हा निर्णय मागे घेण्यासह अधिकाऱ्यांच्या पगाराचे पुनरीक्षण, मोठ्या कर्जदारांना कर्जमाफी देण्याऐवजी एनपीए खात्याची वसुली करून त्याचा फायदा छोट्या कर्जदारांना देणे, अतिरिक्त शुल्क वसुली बंद करावी आणि बँकांचे व्यवहार आठवड्यातून पाच दिवस करण्याची एआयबीओसीची मागणी आहे.

बँकिंग व्यवहार राहणार ठप्प

बँक अधिका-यांचा 26 आणि 27 सप्टेंबरला संप, 28ला चौथा शनिवार आणि 29ला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. त्यानंतर 30 सप्टेंबरला बँकेच्या अर्धवार्षिक लेखा व्यवहारात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त राहतील. त्यामुळे 1 ऑक्टोबरलाच बँकांची कामं करावी लागणार आहेत. तसेच २ ऑक्टोबरला गांधी जयंती असल्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील.

या आहेत मागण्या

1.बँकांचे विलीनीकरण करू नये

2.पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा

3.रोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावी

4.वेतन आणि पगारात बदल करावे

5.ग्राहकांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावी

6.आरबीआयच्या नियमानुसार निवृत्तीवेतन द्यावे

7.एनपीएस रद्द करावा

8.बँकांमध्ये नोकरभरती करावी

या पाच दिवस बँका राहणार बंद

26 आणि 27 सप्टेंबर – विलीनीकरणा विरोधात संप

28 सप्टेंबर – चौथा शनिवार

29 सप्टेंबर- रविवार

30 सप्टेंबर- अर्धवार्षिक हिशेब

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments