Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशबँका थेट सोमवारी उघडणार!

बँका थेट सोमवारी उघडणार!

Bank Strike,Bank, Strikeनवी दिल्ली : बँकांची कामं करण्यासाठी आता सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. देशातील सर्व सरकारी बँक कर्मचा-यांनी आज (शुक्रवार ३१ जानेवारी) उद्या (शनिवार १ फेब्रुवारी) संप पुकारलेला आहे. रविवारच्या सुट्टीला जोडून पुकारलेल्या संपामुळे एकूण तीन दिवस बँकांचं कामकाज बंद  राहील. त्यामुळे थेट सोमवारी बॅंकांचे कामकाज सुरु होईल.

बँक कर्मचारी संघटनांची मध्यवर्ती संघटना असलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ आणि ‘इंडियन बँक असोसिएशन’ यांच्या वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर सहमती न झाल्यामुळे संप पुकारण्यात आला आहे.

बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संपामुळे बँकांच्या शाखेतील कामकाज बंद असेल. ३१ जानेवारी आणि एक फेब्रुवारीचा संप, तर दोन फेब्रुवारी रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत.

संपाला या संघटनांचा पाठिंबा…

इंडियन बँक असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्याशी निगडीत ९ संघटनांनी देशभरात संपाची हाक दिली आहे.

‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ अंतर्गत ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’, ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन’, ‘नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज’, ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशऩ’, ‘बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया’ यांचा समावेश आहे.

याशिवाय ‘इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन’, ‘इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस’, ‘नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स’ आणि ‘नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स’ या संघटनांचा सहभाग आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments