Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभारत ‘बंद’ला हिंसक वळण; तोडफोड, लाठीचार्ज!

भारत ‘बंद’ला हिंसक वळण; तोडफोड, लाठीचार्ज!

Bharat Bandh 2020,Mumbai,Bharat Bandh, Bharat, Bandh ,Mumbai Bandhमुंबई : बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सीएए आणि एनआरसी विरोधात आज बुधवार (२९ जानेवारी) भारत बंदची हाक दिली होती. मात्र, बंद दरम्यान महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहेत. भिवंडी, धुळे, बीड, औरंगाबाद, यवतमाळ, मुंब्रा मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बस गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. तर आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीजार्च करण्यात आले.

मुंबईमध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात सकाळी रेल रोको केला. या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणारी वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने धावत होती. पालघर, यवतमाळ, धुळे, यासह राज्यात काही ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आलं. काही कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे काही कार्यकर्ते आंदोलन सोडून पळून गेले असल्याचेही समोर आले आहे.

Bharat Bandh,Bharat, Bandh,Bharat Bandh 2020,Mumbai Bandh

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अण्ड अग्रीकल्चर यांनी राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंद मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी बंद मध्ये व्यापार सुरुच होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments