Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशभारत बंद; बँकिंग व्यवहारावर परिणाम होणार?

भारत बंद; बँकिंग व्यवहारावर परिणाम होणार?

bank new working hours timings national regional rural banks employeesनवी दिल्ली : केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि विविध क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी उद्या  (बुधवारी ८ जानेवारी) रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. याचा फटका बॅंकिंग व्यवहाराला बसण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि विविध क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी उद्या (बुधवारी) भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये प्रमुख कामगार संघटनांबरोबरच सहा बँक संघटना सहभागी होणार आहेत. यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. मात्र भारत बंदमुळे बँक शाखा ठप्प झाल्या तरी ‘या’ पर्यायातून बँकिंग कामे उरकता येऊ शकतात.

एटीएम सेवेला भारत बंदचा फटका बसणार…

भारत बंदमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी, सहकारी बँक, ग्रामीण बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यामधील कर्मचारी सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया बँक्स असोसिएशनच्या माहितीनुसार सहा बँक युनियन्स उद्याच्या भारत बंदमध्ये सहभागी होत असून यामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होईल. बँक शाखा आणि एटीएम सेवेला भारत बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे.

एसबीआय च्या माहितीनुसार भारत बंदचा फारसा परिणाम होणार नाही. भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या बँक कर्मचारी संघटनांमध्ये ‘एसबीआय’च्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे बँकेच्या सेवेवर परिणाम दिसून येणार नाही, असाही दावा ‘एसबीआय’ने केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments