Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजपवाले हिंदुत्वाचे मालक आहेत काय? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

भाजपवाले हिंदुत्वाचे मालक आहेत काय? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

Jitendra Awhad threatens 'Tanhaji' directorमुंबई : मनसेच्या भगवीकरणामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. असा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्या आरोपाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपवाले हिंदुत्वाचे मालक आहेत काय? हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आता नागपूरमधून घ्यावं लागेल का? हिंदू मतं म्हणजे नेमकं काय? असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.

महाराष्ट्रात काहीही झालं तरी जातीयवादी पक्षांना सगळीकडे शरद पवार दिसतात. पवारांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही, अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. मनसेच्या भगवीकरणामागे शरद पवार यांचं डोकं असून हिंदू मतांच्या विभाजन करण्याची पवारांची ही खेळी आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

राज्यात काहीही झालं तरी त्याचं खापर पवारांवर फोडलं जात असल्याचं मी राजकारणात येण्यापूर्वीपासून पाहत आलो आहे. काही लोक पवार द्वेषाने पछाडलेली आहेत. म्हणूनच या जातीयवादी पक्षांना सर्वत्र पवारच दिसतात. त्यांना पवारांचं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही, असा हल्ला आव्हाड यांनी चढवला.

मनसेने काय करायचं हे मनसे ठरवेल

मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. मनसेने काय करायचं हे मनसे ठरवेल. त्यांचे नेते ठरवतील, ते पवार कसे ठरवतील? मनसेने काय भूमिका घ्यायची हे ते ठरवतील. हिंदुत्वाबाबत सांगायचं झालं तर भाजपवाले हिंदुत्वाचे मालक आहेत का? हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आता नागपूरमधून घ्यावं लागेल का? हिंदू मतं म्हणजे नेमकं काय? आम्हाला काय चंद्रावरची मतं मिळतात का? असा सवालही आव्हाड यांनी केला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रवक्ते राम कदम पक्ष बदलामुळे डिस्टर्ब झाले असून त्यांना काहीही काम उरले नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments