Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्र‘या’ पुस्तकाशी आपला संबंध नाही भाजपने जाहीर करावे : संजय राऊत

‘या’ पुस्तकाशी आपला संबंध नाही भाजपने जाहीर करावे : संजय राऊत

Sanjay Raut , Devendra Fadnavis

मुंबई : ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी भारतीय जनता पक्षाला खडे बोल सुनावले आहेत. या पुस्तकाशी आपला संबंध नाही हे आज संध्याकाळपर्यंत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे महाराष्ट्र भाजपला मान्य आहे का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी यांना कधी १३ वा अवतार ठरवले गेले, तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी त्यांची तुलना केली गेली, याकडे लक्ष वेधत ही केवळ चमचेगिरी असल्याचे राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाने हे पुस्तक त्वरीत मागे घ्यावे. तसेच आज संध्याकाळपर्यंत राज्य भाजपने या पुस्तकाबाबत आपले काय म्हणणे आहे हे स्पष्ट करावे, राज्यातील जनतेलाही ते जाणून घ्यायचे आहे, असे राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ही केवळ चमचेगिरी असल्याचा आहे. याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना नसावी, म्हणून त्यांना दोषी धरता येणार नाही, असेही राऊत यांनी आवर्जून म्हटले आहे. मात्र महाराष्ट्र भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणावी. तो पुस्तक मागे घ्यावा अशीही मागणी राऊत यांनी केली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments