Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजपचे मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव मनसेत!

भाजपचे मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव मनसेत!

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेमध्ये प्रवेश केला आहे. जाधव यांचा काँग्रेस, मनसे, शिवसेना पुन्हा मनसे असा राजकीय प्रवास असून ते पुन्हा स्वगृही परतले आहेत.

मनसेचा आज पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुध्द मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्च्यासाठी राज्यातून मनसे सैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ जानेवारीच्या महाअधिवेशनातचं महामोर्चाची घोषणा केली होती. त्या घोषणेला प्रतिसाद देता मोर्चासाठी अनेक कार्यकर्ते दाखल झाले आहेत. मोर्च्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर सभा होणार आहे. यासाठी मनसेनं जय्यत तयारी केली आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर स्वत: चा पक्ष स्थापन केला होता. जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि जाधव असा सामना रंगला होता. जाधव यांच्या गाडीवर आणि बंगल्यावर हल्ला झाला होता. जाधव यांनी विधानसभेचीही निवडणूक लढवली त्यामध्येही त्यांचा पराभव झाला होता. अखेर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शनिवारी मनसेचा झेंडा हाती घेतला.

मनसेने झेंडा बदलल्यानंतर पक्षामध्ये नवचैतन्य आले आहे. मनसे आणि भाजप युती होणार आहेत अशीही चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेला सोडचिठ्ठी देऊन बाहेर गेलेले पदाधिकारी कार्यकर्ते मनसेत दाखल होत असताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments