Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले, संजय राऊत पगारदार नोकर!

भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले, संजय राऊत पगारदार नोकर!

Sanjay Raut Atul Bhatkalkar,Sanjay Raut, Atul Bhatkalkar,Sanjay, Raut, Atul, Bhatkalkar

मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत हे एका राजकीय पक्षाच्या मुखपत्राचे पगारदार नोकर आहेत. ते धड ना नेते आहेत ना पत्रकार आहेत अशी जहरी टीका भाजपचे प्रवक्ते, आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

विधानसभा निकालानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आक्रमकपणे टीका केली होती. राऊत शिवसेनेची भूमिका मांडत होते. त्यामुळे राऊत हे भाजपच्या रडावर होते. राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी लोकमतच्या कार्यक्रमात मुलाखतीमध्ये इंदिरा गांधी या डॉन करीम लाला यांच्या भेटीसाठी मुंबईत येत होत्या. तसेच भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत असं आव्हान केलं होतं. त्यानंतर भाजपने आणि उदयनराजे समर्थकांनी राऊतांविरोधात रान पेटविले. या सर्व घडामोडीवर ‘एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर’ एका डिबेटमध्ये भाजप प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर टीका केली.

आमदार भातखळकरांनी राऊतांना पगारदार नोकर म्हटल्यानंतर डिबेटमधील पत्रकारांनी भातखळकरांच्या त्या विधानाचा जोरदार निषेध केला. त्यानंतरही भातखळकर पुन्हा चर्चेदरम्यान राऊतांवरील टिकेवर कायम राहिले. पत्रकारांनी भातखळकरांना सांगितले तुम्ही सुध्दा जनतेचे नोकर आहात. तुम्ही सुध्दा मानधन घेतातं. त्यामुळे तुमचं विधान चुकीचं आहे अशी आठवण करुन दिली.

आता पर्यंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींपासून बरेच नेते आधी पत्रकार होते त्यानंतर ते नेते झाले. राजकारणात मोठ्या पदावर गेले. पदभोगली. याची आठवण पत्रकारांनी आमदार भातखळकरांना करुन दिली. त्यामुळे तुम्ही अशी टीका करु नका असाही सल्ला आमदार भातखळकरांना दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments