Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रभाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवार?

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवार?

Sanjay Kakade May Join NCP meet Sharad Pawarपुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी नाकारली त्यामुळे खासदार काकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या जळगाव येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी काकडेंची अपेक्षा आहे. मात्र, काकडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाणार आहे. उदयनराजे यांच्या उमेदवारीवर संजय काकडे यांनी गेल्या आठवड्यात आक्षेप घेतला होता. उदयनराजे यांचं भाजपसाठी काय योगदान आहे? असा सवाल करत काकडे यांनी टीका केली होती. मात्र, भाजप उदयनराजे यांच्या उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काकडे नाराज आहेत.

काही महिन्यांपूर्नी संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची मनधरणी करण्यात यश आलं होतं. त्यामुळे काकडे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय मागे घेतला होता. मात्र, आता पुन्हा तशीच चर्चा सुरु झाली आहे.

मला राष्ट्रवादीकडून निमंत्रण…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला निमंत्रण दिल्याचं संजय काकडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काकडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, याबाबत भाजपकडून कोणतीही अधिकृत अशी प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments