Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईच्या ‘नाईट लाईफ’ला भाजपचा खोडा

मुंबईच्या ‘नाईट लाईफ’ला भाजपचा खोडा

Aaditya Thackeray Ashish Shelar,Aaditya Thackeray, Ashish Shelar,Aaditya, Thackeray, Ashish, Shelarमुंबई : मुंबईमध्ये २४ तास हॉटेल्स, मॉल्स,पब्स सुरु ठेवण्याची संकल्पना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून समोर आली आहे. यासाठी एक बैठक पार पडली. २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. परंतु यामध्ये भाजपने खोडा घातला असून नाईट लाईफला आमचा विरोध राहिल असं जाहीर केलं आहे.

युतीचं सरकार असताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना मांडली होती. मात्र त्यावेळी याबाबत काही निर्णय झाला नाही. आता सत्तांतर झालं महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वातं आलं. आदित्य ठाकरे हे स्वत: मंत्री झाले त्यामुळे त्यांच्या प्रस्तावाला महत्व प्राप्त झाल आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भातला निर्णय प्रायोगिक तत्त्वार घेतला आहे. त्यामुळे पुढे किती प्रमाणात प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

काय म्हणाले आशिष शेलार…

मुंबईत हॉटेल्स, बार, पब चोवीस तास सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल्स, पब चोवीस तास सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहिल असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments