Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपच्या संकल्पपत्रात जुनेच तुणतुणे

भाजपच्या संकल्पपत्रात जुनेच तुणतुणे

bjp released Sankalp Patra for maharashtra assembly election
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचं संकल्पपत्र आज मंगळवारी जाहीर केलं आहे. मात्र, यामध्ये त्यांनी शिवरायांचे अरबी समुद्राती स्मारक, इंदु मिल येथील बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण करणार असल्याचे जुनेच तुणतुणे वाजवले.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा, महाराष्ट्र भाजपा प्रभारी सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होते. नड्डा यांनी भाजपच्या संकल्पपत्र घोषित करण्यात आलं. त्यामध्ये ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

याशिवाय संकल्प पत्रात १ कोटी रोजगार, २०२२ पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी, शेतकऱ्यांना १२ तास वीज अशा घोषणा, ५ वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरवर नेण्याचं ध्येय असल्याचं या संकल्पपत्रात मांडण्यात आलं आहे.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे

1. येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार उपलब्ध करणार

2. ५ वर्षात शेतीला लागणाऱ्या वीज सौर उर्जेवर देऊन १२ तास वीज देणार

3. २०२२ पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी

4. मुलभूत सेवेसाठी केंद्र सरकारच्या मदतीने ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

5. ५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार

6. कोकणातील १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा विषय, पूर्व विदर्भातील पाणी पश्चिम विदर्भात आणणार, पुरात वाहून जाणारे पाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागासाठी वापरणार

7. भारत नेट आणि महाराष्ट्र नेटच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला इंटरनेटने जोडणार

8. शिवरायांचे स्मारक, बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण करणार

9. ३० हजार किमीचे रस्ते बनवणार

10. १६७ टीएमसी पाणी दुष्काळी भागात नेणार

11. मराठवाड्यात वॉटर ग्रीड राबवणार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments