Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeकोंकणपालघरआर्थिक परिस्थितीला कंटाळून ‘या’ बॉडीबिल्डरची आत्महत्या!

आर्थिक परिस्थितीला कंटाळून ‘या’ बॉडीबिल्डरची आत्महत्या!

Ali salmani bodybuilder,Ali salmani, bodybuilder,Ali ,salmani,body,builderमुंबई : आर्थिक परिस्थितीला कंटाळून एका बॉडीबिल्डरने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. अली सालेमानी (वय ३५) असं आत्महत्या करणा-या बॉडीबिल्डर नावं आहे. अली सालेमानीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना विरार पूर्वे मध्ये घडली.

विरार येथील शिवलीला अपार्टमेन्टमध्ये बॉडीबिल्डर अली सालेमानी राहत होता. आर्थिक परिस्थितीसमोर हतबल होऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचललं. त्याने तीन वेळा वसई श्री, एकदा दहिसर श्री आणि ज्युनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून त्याने अनेक तरुणांना शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले होते. अनेक दिवसांपासून त्याची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अखेर कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्या मागे दोन मुली, बायको आणि एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments