Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनबॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या

बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या

kushal punjabi actor,kushal, punjabi, actor,suicide,diedमुंबई : टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी (३७) याने मुंबईत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्ये मागचं कारण अद्याप समोर आलं नाही. कुशलनं काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. बांद्रा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील चौकशी करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीच निधन झालं आहे. लक्ष्य, अंदाज, सलाम-ए-इश्क सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या कुशल पंजाबीच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कुशल पंजाबीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. यासंबंधी कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र स्पॉटबॉय-ईने दिलेल्या वृत्तानुसार कुशल पंजाबीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कुशलचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. कुशल आणि करणवीर अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र होते.

करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुशल पंजाबीचा फोटो पोस्ट केला आहे. तो फोटो पोस्ट करत ‘तुझ्या निधनाची बातमी ऐकताच मला धक्का बसला आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही. मला माहित आहे तू जिथे कुठे आहेस तिथे खूश आहेस. तू ज्याप्रकारे तुझे आयुष्य जगत होतास त्याने मला प्रेरणा मिळाली,’ असे करणवीरने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

कुशलने १९९५ मध्ये ‘अ माउथफुल ऑफ स्काई’ या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘लव मैरिज’, ‘सीआयडी’, ‘देखो मगर प्यार से’, ‘कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोर’, ‘श्श्श… फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा 7’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’ ,‘ईश्क मै मरजावा’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

कुशलने चित्रपटांमध्ये देखील सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. त्याने अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’, अजय देवगणसोबत ‘काल’ आणि सलमान सोबत ‘सलाम-ए-इश्क’ आणि ‘दन दना दन गोल’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुलशने यूरोपियन मुलीशी लग्न केले होते. २०१६ मध्ये त्याला एक मुलगा झाला. कुशलने त्याच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती.

आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नका….

कुशल पंजाबी याने आत्हत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली. ती चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. त्या चिठ्ठीमध्ये त्याने कुणालाही जबाबदार धरु नये असे लिहीले आहे. मात्र आत्मह्त्येचे कारण समजू शकले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments