Thursday, March 28, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादखासदार इम्तियाज जलीलांवर आरटीआय कार्यकर्ता मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

खासदार इम्तियाज जलीलांवर आरटीआय कार्यकर्ता मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

Imtiyaz Jaleel AIMIM,Imtiyaz Jaleel, AIMIM,Imtiyaz, Jaleel

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीत रविवार (२६ जानेवारी) रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते नदीम राणा यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गाडीची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी नदीम राणांच्या तक्रारीवरून खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रजासत्ताकदिना निमित्त रविवारी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी दौलताबादकडे रॅली जात असताना आरटीआय कार्यकर्ते नदीम राणा यांच्यावर हल्ला झाला होता. यामध्ये नदीम राणा गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या गाडीचेही नुकसान झाले होते.

नदीम राणा यांनी काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच इम्तियाज जलील यांनी वक्फच्या जमिनीवर कार्यालय बांधल्यामुळे त्या विरोधात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांच्याकडे लेखी तक्रार करुन कारवाईची मागणी केली होती. या रागातून हा हल्ला झाला असल्याचा आरोप नदीम राणा यांनी केला होता. हा हल्ला इम्तियाज जलील व त्यांच्या कार्यकर्त्यांना केला होता. तसेच हातपाय तोडण्याची धमकी दिली होती असा आरोप करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments