Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई‘त्या’ बाईला इंग्रजी, हिंदी चांगलं बोलता येते; खैरेंची उद्विग्नता!

‘त्या’ बाईला इंग्रजी, हिंदी चांगलं बोलता येते; खैरेंची उद्विग्नता!

Priyanka Chaturvedi Chandrakant Khaire,Priyanka Chaturvedi, Chandrakant Khaire,Priyanka, Chaturvedi, Chandrakant, Khaireमुंबई : शिवसेनेचे उपनेते माजी खासदार चंद्रकांत खैरेंना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षश्रेष्ठीवर घणाघाती टीका केली. राज्यसभेची उमेदवारी प्रियंका चतुर्वेदींना जाहीर करण्यात आली आहे. त्यावर खैरे म्हणाले की, त्या बाईंना (प्रियंका चतुर्वेदी) इंग्रजी,हिंदी चांगलं बोलता येतं. त्या आता चांगलं काम करतील. आम्ही जुने शिवसैनिक आहोत. आम्ही देखील मराठवाड्यासाठी खूप काम केले. पण आमचे काम त्यांना दिसत नाही. आदित्य ठाकरेंना प्रियंका चतुर्वेदी यांचे काम आवडले असेल. त्यामुळे त्यांनी उमेदवारी दिली असेल. अशीही उव्दिगनता व्यक्त केली.

खैरे म्हणाले आम्ही बाळासाहेबांचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आम्ही कधीही इकडे तिकडे गेलो नाही. मराठवाड्यात शिवसेना वाढवण्याचे काम आम्ही केलं. मला खासदारकीची गरज नव्हती. खैरे म्हणाले की, मला माझी स्वतःशी महत्वाकांक्षा नाही. मी याआधी चार वेळेला खासदार झालो आहे. परंतु मराठवाड्याला, मतदारांना त्याची गरज होती. आपली नाराजी बोलून दाखवणार का यावर बोलताना पक्षप्रमुखांना ते म्हणाले की, मला माझी स्वतःशी महत्वाकांक्षा नाही. मी याआधी चार वेळेला खासदार झालो आहे. पण माझ्या समाजातील आणि मराठवाड्यातील लोकांना अपेक्षा होती. मी स्वतःहून उद्धव ठाकरेंकडे जाणार नाही, त्यांनी बोलावले तर नक्की जाईन.

राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी मिळाली आहे. खासदार अमर साबळे आणि अपक्ष भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीची चर्चा होती मात्र त्यांचा पत्ता कट झाला आहे. उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले, डॉ.भागवत कराड यांनी गुरुवारी (१२ मार्च) राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडून आज प्रियंका चतुर्वेदींना तर काँग्रेसकडून माजी खासदार राजीव सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या ७ खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच राज्यसभेच्या या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

अशी असते ही निवडणूक…

विधानसभेतील २८८ सदस्यांचा विचार करता कोणत्याही पक्षाला आपला एक उमेदवार राज्यसभेत पाठवायचा असेल तर त्यासाठी ३७ आमदरांची गरज आहे. भाजपकडे १०५  आमदार असून नऊ अपक्ष आमदरांचा त्यांना पाठिंबा आहे.

विधानसभेतील आमदारांच्या मतांच्या आधारावर राज्यसभेत उमेदवार पाठवले. जातात. विधासभेतील आमदार आपल्या पहिल्या पसंतीची मते उमेवारांना देतात. त्या आधारावर जर निर्णय होऊ शकला नाही. तर उमदेवारांना देण्यात आलेली दुस-या पसंतीची मते विचारात घेतली जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments