Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपाच दिवसांचा होणार आठवडा?, मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

पाच दिवसांचा होणार आठवडा?, मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

राज्यकर्मचा-यांसाठी पाच दिवसांचा आठवडा

Good news will given to MLAs on Matoshree by Shiv Sena party chiefमुंबई : राज्य सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली होती. त्या बाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अहवाल मागविला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात राज्य सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात शासकीय कामकाजासाठी पाच दिवसांचा दिवसांचा आठवडा करणे, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या बक्षी समितीने वेतनत्रुटीबाबत दुसरा अहवाल तत्काळ सादर करणे, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वाहतूक भत्त्यासह इतर भत्ते राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना देणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, अधिकाऱ्यांच्या पाल्यांनाही अनुकंपा भरती सुविधा लागू करणे अशा १८ मागण्यांवर युती सरकारच्या काळात चर्चा झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments