Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्यामहाविकास आघाडीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापन्याचा दावा : जयंत पाटील

महाविकास आघाडीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापन्याचा दावा : जयंत पाटील

Claim to establish power from Maha Vikas Aghadi alliance Jayant Patil Eknath Shinde Balasaheb Thoratमुंबई : महाविकास आघाडीकडे सत्तास्थापनेसाठी 162 आमदारांचा पाठिंबा आहे. पाठिंब्याचा पत्रावर 162 आमदारांचे सह्या व नावासहीत राज्यपालांकडे आज सोमवारी सुपूर्द करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी शिवसेनेचे विधीमंडळाचे नेते आमदार एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार विनायक राऊत, अबु आझमी, आमदार के सी पाडवी, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, उपस्थित होते.

162 आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना दिले. सत्तास्थापन करण्याचा दावा केला. जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्याकडे संख्यांबळ अपूर्ण आहे. बहुमत सिध्द करण्यास असमर्थ ठरल्यानंतर, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, सीपीएम, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी, 7 अपक्ष सर्व मिळून 162 संख्याबळ आमच्याकडे आहेत असेही पाटील म्हणाले.

राज्यपालांना दिलेल्या यादीमध्ये अजित पवार, अण्णा बनसोड, आत्राम यांच्या सह्या नाहीत. परंतु बनसोड आणि आत्राम राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत असेही पाटील यांनी सांगितले. सर्व 162 आमदारांना राज्यपालांकडे आम्ही उभं करू शकतो. त्यांची परेड घेऊ शकतात. मात्र, आज राज्यपाल मुंबईमध्ये नाहीत. आमची तयारी आहेत असेही पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments