हॉस्पिटल ऑन व्हील्स

- Advertisement -


बुधवार दि 25 मे रोजी जम्मु मधील बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनच्या वतीने आणि स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशनच्या समाज कार्याच्या निधीतून जम्मु काश्मीर मधील *सीमावर्ती भागातील गूरेज आणि कारगील मधील जनतेच्या सेवेसाठी* अद्ययावत 2 अँब्युलन्स प्रदान करण्याचा सोहळा देशाचे वित्त राज्यमंत्री मा. ना. भागवतराव कराड* यांच्या *दिल्ली येथील निवासस्थानी झाला.

या कार्यक्रमास श्री अमिताभ चटर्जी, चीफ जनरल मॅनेजर SBI नवी दिल्ली सर्कल, श्री ललित मोहन इंटरिम मॅनेजिंग डायरेक्टर SBI फाउंडेशन, श्री एजाज मोह्यी, झोनल मॅनेजर SBI कॅपिटल, बिणू ॲडिशनल कमिशनर, इन्कमटॅक्स, दिल्ली, तसेच फाउंडेशनचे विश्वस्त ॲड नरसिंह लगड, वीरेंद्र शहा, वैदेही तामण, चीफ एडिटर, आफ्टरनुन व्हॉईस, प्रकाश गोरे, धैर्यशील काकडे, डॉ. मनीषा पळसकर, सुमित कामडी, शरद गरकल, पंकज लाडवे, गोव्याच्या मुक्ता दृष्टी फाउंडेशनचे

किशोर सारसोलकर पंढरपूरचे डॉ चांगदेव कांबळे, आदि मान्यवर उपस्थित होते

- Advertisement -
- Advertisement -