Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रसोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार; ‘हे’ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार

सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार; ‘हे’ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार

Uddhav Thackeray,Jayant Patil,Balasaheb Thorat, maharashtra vikas aghadi, ministry, maharashtra, mva, cabinet ministry

मुंबई : उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन दोन नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अखेर राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. तिन्ही पक्षातील राज्यातील विविध भागातील नेते मंत्रिपदाची शपथ सोमवारी घेणार आहेत. संभाव्य मंत्र्यांची नावे काही वृत्तवाहिन्यांनी जाहिर केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी विधानभवनाच्या प्रांगणात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु आहे. ३० मंत्री शपथ घेण्याची शक्यता  आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य नेत्यांच्या नावाची यादीही समोर आली. यामध्ये शिवसेनेचे १३ नेते, राष्ट्रवादीचे १३ नेते तर काँग्रेसचे १० नेते उद्या मंत्रीपदाची शपथ घेतील. या विस्ताराद्वारे मंत्रिमंडळातील सर्व खाती भरण्यात येणार असल्याचे कळते. यामध्ये शिवसेनेचे १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री तर काँग्रेसचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री असतील.

राष्ट्रवादी काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र  अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे
विदर्भ  अनिल देशमुख
ठाणे  जितेंद्र आव्हाड
मुंबई  नवाब मलिक
मराठवाडा  धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे
कोकण  आदिती तटकरे
उत्तर महाराष्ट्र  डॉ. किरण लहामटे

 काँग्रेस

उत्तर महाराष्ट्र  के. सी. पाडवी
मराठवाडा  अशोक चव्हाण, अमित देशमुख
पश्चिम महाराष्ट्र  सतेज पाटील, विश्वजीत कदम
विदर्भ  विजय वड्डेटीवार
मुंबई  वर्षा गायकवाड किंवा अमिन पटेल

शिवसेना

मुंबई  अनिल परब, रविंद्र वायकर, सुनील प्रभू, सुनील राऊत
कोकण  उदय सामंत, भास्कर जाधव, वैभव नाईक
पश्चिम महाराष्ट्र  संभुराजे देसाई, प्रकाश अबिटकर
मराठवाडा  संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत
विदर्भ  आशिष जैसवाल, संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड
ठाणे  प्रताप सरनाईक
उत्तर महाराष्ट्र  गुलाबराव पाटील, दादा भुसे, सुहास कांदे

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments