Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर वारिस पठाण यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल

अखेर वारिस पठाण यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल

Waris Pathan,Waris, Pathanमुंबई : आम्ही १५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी पडू या चिथावणीखोर विधानाविरोधात एमआयएमचे नेते माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संघर्ष सामाजिक संस्थेचे पृथ्वीराज म्हस्के यांनी तक्रार दिली आहे.

waris pathan letter,waris pathan, letter, pathan letter,waris letter

भायखळ्याचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केलं. या सभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तुम्हाला घाम फुटला आहे. आम्ही सुध्दा बाहेर पडलो तर काय होईल याचा विचार करा. असं वादग्रस्त विधान वारिस पठाण यांनी केलं होतं.

संघर्ष सामाजिक संस्थेचे पृथ्वीराज म्हस्के यांनी माजी आमदार वारिस पठाण यांच्याकडे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), झोन १० चे पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments