Thursday, March 28, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेमनसेच्या 'बोगस' शोध मोहिमेविरूध्द कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल!

मनसेच्या ‘बोगस’ शोध मोहिमेविरूध्द कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल!

raj thackeray mns assembly electionपुणे : पुण्यातही बांगलादेशी म्हणून पोलिसांच्या ताब्यात देणारे मनसे कार्यकर्ते अडचणीत आले आहेत. पकडून देण्यात आलेले लोक बांगलादेशी नसल्याचं आढळून आल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांसह ८ ते ९ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात दोन दिवसांपूर्वी मनसेने बांगलादेशींविरोधात मोहीम उघडली होती. पुण्यातील धनकवडी येथून तीन कथित बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. मनसे कार्यकर्त्यांनी घरात घुसून या लोकांना पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. मात्र पोलीस तपासात हे तिन्ही लोक भारतीय असल्याचं आढळून आल्याने त्यांना सोडून देण्यात आलं होतं. दरम्यान, या प्रकरणी मनसेचे अजय शिंदे आणि सचिन काटकर यांच्यासह ८ ते ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेच्या बांगलादेशी मोहिमेचा फज्जा उडाल्याचं बोललं जात आहे.

मनसेच्या मुंबईतील मोर्चानंतर मोहिमेला सुरुवात…

मनसेने मुंबईत बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात ९ फेब्रुवारीला मोर्चा काढला होता. यावेळी घुसखोरांना भारतातून हाकलण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर बोरिवली आणि ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बांगलादेशींविरोधात मोहीम हाती घेतली होती.

काही वर्षांपासून बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिकांचा अनेक गुन्ह्यांत समावेश आढळून येत होता. अंमली पदार्थांचे व्यवहार, ऑनलाइन फसवणुकीत बांगलादेशी नागरिक सक्रिय असल्याचे समोर आले होते. विरार, अर्नाळामधील २२ विनापरवाना भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यात १२ पुरुष, १० महिला आणि एका बालकाचा समावेश होता. हे सर्व आरोपी रोजगारासाठी भारतात गेल्या काही वर्षांपासून राहत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments