Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशदिल्ली हिंसाचार : काँग्रेसचा राष्ट्रपती भवनावर मार्च

दिल्ली हिंसाचार : काँग्रेसचा राष्ट्रपती भवनावर मार्च

Gandhi Protests Delhi Violence,Gandhi Protests, Delhi Violence,Gandhi, Protests, Delhi, Violenceनवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील तीन दिवस झालेल्या हिंसाचारानंतर आज चौथ्या दिवशी तणावपू्र्ण शांतता आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २० लोकांचा बळी गेला आहे. तर, २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दुकानांची,वाहनांची तोडफोड, जाळपोळ सुरुच आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. कायदा सुव्यस्था नियंत्रणात आणण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपती भवनावर मार्च काढण्यात येणार आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. दिल्लीत चार दिवसांपासून हिंसाचार उफाळला आहे. केंद्र सरकार, गृह खात्याला हा हिंसाचार रोखण्यात अपयश आले आहे. शाळांना सुटी देण्यात आली. परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदली लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments