Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेच्या पाठिंब्याबाबत काँग्रेसचा 'हा' आहे मुहूर्त!

शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत काँग्रेसचा ‘हा’ आहे मुहूर्त!

mallikarjun kharge on government
दिल्ली : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चार वाजता पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये राज्याच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांना सांगितले.

राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापन करण्याचा निमंत्रण दिलं आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंतचा शिवसेनेला वेळ दिलेला आहे. भाजपने सत्तास्थापन करण्यात आम्ही असमर्थ आहोत हे रविवारी जाहीर केलं होत. त्यामुळे राज्यपालांनी सर्वात मोठ्या दुस-या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला निमंत्रण दिल आहे. त्यामुळे शिवसेना बहुमत सिध्द करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं शिवसेनेन आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तो पर्यंत सर्वांचीच उत्सूकता वाढलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments