Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याकांद्याच्या वाढत्या दराविरोधात काँग्रेसची निदर्शने

कांद्याच्या वाढत्या दराविरोधात काँग्रेसची निदर्शने

Congress's protest at Parliament premises over rising onion prices
Image : ANI

नवी दिल्ली : कांद्याच्या वाढत्या दराविरोधात संसद भवन परिसरात काँग्रेसच्या वतीने आज गुरुवारी निदर्शने करण्यात आली आहे. कांदा किरकोळ बाजारात 150 रुपये दराने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांद्याने रडवले आहे. काँग्रेसने दरवाढी विरोधात निदर्शने केली.

या आंदोलनात काँग्रेसचे सर्व खासदार उपस्थित होत. यावेळी खासदारांनी जोरदार निदर्शने करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. दरवाढीचा निषेध नोंदवला. यामुळे संसद परिसर दणाणून गेलं होतं.

केंद्र सरकार तुर्की देशातून 11000 टन कांदा आयात करणार आहे. भारतात कांद्याचे दर गगनाला भिडले असून यावर नियंत्रणासाठी सरकारचा प्रयत्न आहे. सध्या कांदा 150 रुपये किलोच्या घरात पोहोचला आहे. मात्र, सध्या तरी कांद्याचे दर असेच राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तो पर्यंत चढ्या दरानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments