Thursday, March 28, 2024
Homeदेशपंतप्रधानांनी घेतला कोरोनाचा धसका; होळी खेळण्यास नकार!

पंतप्रधानांनी घेतला कोरोनाचा धसका; होळी खेळण्यास नकार!

Narendra Modi Holi,Narendra Modi, Holi,Narendra, Modi,Narendra Modi wont participate in Holi

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला वित्तीय संकटानंतरचा सर्वात मोठा धोका निर्माण केला आहे. तर दुसरीकडे देशात तीन कोरोनाचे २८ रूग्ण आढळल्यानंतर सर्वांनीच दक्षता घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा होळी खेळणार नाही असं जाहीर केलं आहे.

दिल्लीच्या २५ हॉस्पीटलमध्ये विशेष कक्ष स्थापन केले आहेत.  कर्माचा-यांसाठी आठ हजार कीट व साडेतीन लाख मास्क दिले आहेत. परदेशांतून आलेल्या आयटीबीपीच्या शिबीरात ठेवण्यात येणार असून, त्यासाठी २५०० लोकांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चीन हाँककाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान,नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम,मलेशिया, इराण व इटली येथून आलेल्या ६५,६२१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.

देशभरातील ६२ विमानतळांवर सीआयएसएफचे जवान तैनात असतात. त्यामुळे देशाच्या सर्व विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानांना मास्क, सॅनिटायझर, हातमौझे देण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments