Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
HomeदेशCOVID19 : इराणमध्ये अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले

COVID19 : इराणमध्ये अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले

coronavirus 234 indian nationals who were evacuated from iranजगभरात कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. कोरोनाच्या दहशतीत जगणाऱ्या इराणमध्ये २३४ भारतीयांना मायेदशी आणण्यात आलं आहे. इराणमधून भारतात आलेली ही तिसरी बॅच आहे. या विमानात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक होते. इराणमधून आलेल्या नागरिकांची आधी तपासणी करण्यात येणार आहे. यानंतर त्यांना सोडलं जाईल.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ही माहिती दिली. इराणमध्ये अडकलेले २३४ देशवासियांना भारतात परत आणण्यात आले. या निमित्त त्यांनी राजदूत धामू आणि इराण सरकारचे आभार मानले. याआधी इराणमधून मंगळवारी ५८ प्रवाशांना आणण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी ४४ प्रवाशांना भारतात आणले गेलं होतं. या सर्वांना जैसलमेरमधील लष्कराच्या स्वतत्रं कक्षात निरीक्षणसाठी ठेवण्यात आले आहे. कोरोनाची तपासणी करून त्यांना सोडण्यात येईल.

पश्चिम आशियाई देशांमद्धे इराण हा कोरोना व्हायरसने सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे. इराणमध्ये शनिवारी कोरोना व्हायरसने जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला आहे. यानुसार इराणमधील कोरोनामुळे मृतांची संख्या ७०० पर्यंत पोहोचली आहे. इराणमध्ये अंदाजे १३ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहीत समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments