Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus | महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी!

Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी!

coronavirus-fourth-death-in-maharashtraमुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात आज कोरोना मुळं ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या मृत्युमुळं राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आज मृत्यू झालेला इसम १५ मार्च रोजी यूएईहून भारतात आला होता. प्रथम तो अहमदाबादेत आला व नंतर मुंबईत आला होता. ताप, खोकला व श्वसनाच्या त्रासामुळं संबंधित व्यक्तीला २३ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला उच्च रक्तदाब आणि डायबेटिसचा विकारही होता. ‘कोरोना’च्या आजाराची लक्षणं असल्यानं त्याची तातडीनं चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उत्तरोत्तर प्रकृती खालावत जाऊन आज त्याचा मृत्यू झाला. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

रुग्णांची संख्या 101 वर…

आज राज्यात आणखी चार नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत ४१, पुणे १९, पिंपरी-चिंचवड १२, नागपूर ४, यवतमाळ ४, कल्याण ४, नवी मुंबई ४, सांगली ४, नगर २, सातारा २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments