Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबादेत कोरोनाबाधीत महिला आढळली

औरंगाबादेत कोरोनाबाधीत महिला आढळली

राज्यातील आकडा ३२वर

Coronavirus patients in Mumbai, coronavirus, mumbai coronavirus, maharashtra, uddhav thackerayऔरंगाबाद : मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबादमध्येही करोनाचा रुग्ण आढळला आहे. औरंगाबादमधील हा पहिलाच कोरोनाचा रुग्ण असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या ३२वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्त महिला रशीयाहून औरंगाबादेत दाखल झाली होती. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमध्ये एका ५९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला विलगीकरण कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. ही महिला रशिया आणि कझाकिस्तानचा प्रवास करून आली असल्याचं सांगण्यात येत. या महिलेला धूत रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण आढळल्याने येथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

त्या सर्वांची तपासणी होणार…

या घटनेनंतर ही महिला ज्या लोकांच्या संपर्कात आली होती, त्या सर्वांची माहिती घेण्यात येणार असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या महिलेच्या कुटुंबीयांचीही तपासणी करण्यात येणार  आहे.

राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली…

राज्यात आतापर्यंत ३२ रुग्ण आढळून आले असून, पुणे येथे १५, मुंबई ५, रायगड १, कल्याण १, अहमदनगर १, नागपूर ४, ठाणे १, यवतमाळ २, नवी मुंबई १ आणि औरंगाबाद १ असे एकूण ३२ रुग्ण आढळून आले आहेत. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. तसेच नागरिकांना मॉल, बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments