मुंबईत तूर्तास संचारबंदी नाही; पालिका अतिरिक्त आयुक्तांचं मोठं विधान

- Advertisement -
coronavirus-no-curfew-imposed-in-mumbai-says-bmc-suresh-kakani
coronavirus-no-curfew-imposed-in-mumbai-says-bmc-suresh-kakani

मुंबई: मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातून कोरोना संसर्ग वाढल्याची धक्कादायक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सध्यातरी मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा विषय अजेंड्यावर नसल्याचंही काकाणी यांनी सांगितलं.

सुरेश काकाणी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बार, पब आणि रेस्टॉरंटसह मंगल कार्यालयांवर कारवाई केली जात आहे. सध्या मुंबईत 82 टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. फक्त 18 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतील आहेत, असं काकाणी यांनी सांगितलं.

तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही

- Advertisement -

मुंबईकरांनी कोरोना नियमांची काटेकोर अमलबजावणी करावी. त्यांनी कोरोना नियमाची काटेकोर अमलबजावणी केल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. तसेच संचारबंदी लागू करण्याचा विषयही अजेंड्यावर नाही. मुंबईत सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यापेक्षा लोकांमध्ये कोरोना विषयक जागृती करण्यावर भर देण्यात येत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पोलिसांची मदत घेऊ

मुंबईकरांनी मास्क लावणं बंधनकारक आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. प्रसंगी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाईल. अशा लोकांकडून पोलीस जो दंड वसूल करतील त्यातील 50 टक्के रक्कम महापालिकेला मिळेल आणि उरलेली 50 टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीला देण्यात येईल, असंरही त्यांनी सांगितलं.

बेड, कोविड सेंटर पुरेसे

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मुंबईतील कोविड सेंटर आणि बेड्स पुरेसे आहेत. या आधी कोरोनाचा जो प्रोटोकॉल पाळण्यात आला. तोच आताही पाळण्यात येईल. तसे आदेशच आले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईची सद्यस्थिती काय?

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत आहे. मुंबईत काल 921 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

मुंबईतील कोरोना अपडेट

24 तासात नवे रूग्ण – 921

24 तासात मृत्यू – 6

एकूण रूग्ण – 3,19,128

एकूण मृत्यू – 11,446

एकूण डीस्चार्ज – 3,00,959

अॅक्टीव्ह रूग्ण – 5859

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here