Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशदिल्ली दंगलीची न्यायालयीन चौकशी करा; एसआयटीवर विश्वास नाही - मुकुल वासनिक

दिल्ली दंगलीची न्यायालयीन चौकशी करा; एसआयटीवर विश्वास नाही – मुकुल वासनिक

Mukul Wasnik Congress,Mukul Wasnik, Congress,Mukul, Wasnik
Image: ANI

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीमुळे देशाची प्रतिमा खराब झाली. पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आमचा एसआयटीवर विश्र्वास नाही. दंगलीची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीने व्होट बॅंकेचे राजकारण केले असा आरोप काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी केली आहे. दिल्ली हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायधिशांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी कोली. हिंसाचारातील प्रत्येक पीडित कुटुंबाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. हिंसाचारादरम्यान ज्या पोलिस कर्मचा-यांनी काहीच केले नाही त्यांच्यावर तसेच भडकाऊ भाषण करणा-यांवर कारवाई करण्यात यावी. असेही मुकुल वासनिक यांनी म्हटले आहे.

अमित शाह यांनी राजीनामा द्यावा…

दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आहे. दिल्लीतील परिस्थितीला रोखण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. दिल्ली निवडणुकीच्यावेळी त्यांनी एक भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी ईव्हिएमचा बटन एवढ्या जोरात दाबा की, हा करंट शाहीन बागेत पोहोचला पाहिजे. कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, परवेश वर्मा यांनी चिथावणीखोर भाषण दिले. त्यांच्यावर कोणताही कारवाई झाली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुकुल वासनिक यांनी केली.

दिल्ली दंगलीचा अहवाल सोनिया गांधींनी सोपवला – मुकुल वासनिक

दिल्ली दंगलीतील सर्व पीडितांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दंगलग्रस्त भागात जाऊन पीडितांची भेट घेतली. त्याबाबतचा अहवाल आज सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोपविला. या शिष्टमंडळात दिल्ली प्रभारी शक्तीसिंह गोयल, महामंत्री तारीक अन्वर, माजी मंत्री कुमारी शैलजा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष सुष्मीता देव यांचा समावेश होता. अशीही माहिती मुकुल वासनिक यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments